Breaking

Friday, July 2, 2021

मुंबई, पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहताय?; अजित पवार यांनी दिला 'हा' विश्वास https://ift.tt/3yiEv1X

पुणे: सध्या करोनाच्या संकटाचा काळ सूरु आहे. या संकटाच्या काळात सुद्धा म्हाडाच्या २ हजार ९०८ घरांसाठी ५७ हजार जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. घरांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याचाच अर्थ सामान्य लोकांचा ''वर विश्वास असल्याचे सांगताना राज्यातील सामान्य जनतेचा हाच विश्वास 'म्हाडा'ने जपावा आणि वाढवावा असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी केले. ( ) वाचा: गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) २ हजार ९०८ सदनिकांसाठीची ऑनलाइन लॉटरीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडत झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने व नागरिक उपस्थित होते. वाचा: मुंबई, पुण्यासारख्या शहरात आपलंही एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हाडाच्या लॉटरीत घरांसाठी अर्ज करणे हा सुद्धा या प्रयत्नांचाच एक भाग आहे. या प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सगळ्यांनाच घर मिळावे, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, आज फक्त २ हजार ९०८ घरे असल्याने तितक्याच जणांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ज्यांचा नंबर लागणार नाही त्यांनी निराश न होता प्रयत्न करत राहिले पाहिजे. एक ना एक दिवस प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर हा आपला कार्यक्रम आहे. ही २ हजार ९०८ घरांची लॉटरी हे सुद्धा त्याच ध्येयाच्या दिशेने पडलेले एक आश्वासक पाऊल आहे. पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचाही सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या नव्याने वाढणाऱ्या शहराचा विकास नियोजनबद्धपणे करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. राहण्यासाठी राज्यातले सर्वोत्तम शहर म्हणून पुण्याचा क्रमांक लागतो. हे राज्यात सर्वोत्तम असणारे आपले पुणे शहर देशात सर्वोत्तम बनवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू या, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. म्हाडाचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे, अशा शब्दांत कौतुक करताना पुणे शहराच्या विकासासाठी म्हाडाने आणखी चांगले योगदान द्यावे असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. लॉटरीच्या निमित्त ज्यांना हक्काचे घरं मिळणार आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन. इतरांनी निराश न होता म्हाडाच्या पुढच्या सोडतीत भाग घ्यावा, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hd9siz

No comments:

Post a Comment