Breaking

Thursday, August 5, 2021

महिलेच्या नावाने फेसबुक अकाऊंट काढून अश्लील फोटो केले शेअर; नातेवाईकाला अटक https://ift.tt/2TVQBzw

: तरुणाने महिलेच्या नावे फेसबुकवर बनावट खाते तयार करत त्यावर अश्लील पोस्ट, छायाचित्र पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार महिलेची बदनामी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या ग्रामीणच्या सायबर पोलिसांनी आवळल्या. ऋषिकेश अनिल वायखिंडे ( वय २३ रा. दौंड, जि. पुणे) असं आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने ठाण्यात तक्रार दिली होती की, अज्ञात इसमाने तिच्या फोटोचा व नावाचा वापर करुन सोशल मीडियावर बनावट खाते तयार केले. त्यावर तक्रारदार महिलेचा संपर्क क्रमांक देऊन बनावट खात्यावरुन अज्ञात लोकांना, तसेच तक्रारदार महिलेच्या नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहे. बनावट खात्यावर वेगवेगळ्या महिलांचे अश्लील फोटोही पोस्ट करण्यात आले होते. सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत अत्यंत बारकाईने व तांत्रिक पद्धतीने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यात फिर्यादी महिलेच्या नावे सोशल मीडियावर बनावट खाते तयार करणारा आरोपी हा दौंड येथील रहिवासी ऋषिकेश अनिल वायखिंडे असल्याचे समोर आले. पोलिसांनी कारवाई करत दौंड येथून ऋषिकेश याच्या मुसक्या आवळल्या. प्रारंभी त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे समोर ठेवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. आरोपी ऋषिकेश हा तक्रार महिलेचा नातेवाईक आहे. पीडित महिलेने बोलण्यास नकार दिल्याने संतप्त ऋषिकेश याने अद्दल घडवण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक घुगे, पोलिस कर्मचारी कैलास कामठे, संदीप वरपे, रवींद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईम, सविता जायभाय, लखन पचोळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड, रुपाली ढोले यांनी ही कामगिरी केली. 'निर्भिडपणे तक्रार करा' 'अशा प्रकारे कोणीही महिला, मुलींना त्रास देत असेल तर त्यांनी निर्भिडपणे तक्रार करावी. शांत राहू नका, अशी कुठलीही तक्रार असल्यास तत्काळ सायबर पोलिस ठाण्यास संपर्क साधावा,' असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3juyxFk

No comments:

Post a Comment