टोकियो : भारताला धावपचू दुती चंदकडून मोठ्या अपेक्षा होत्या, त्यामुळेच सोमवारी सकाळी सर्वांचे डोळे तिच्या शर्यतीवर लागलेले होते. पण महिलांच्या २०० मीटर शर्यतीमध्ये दुतीला सातवे स्थान मिळाले. त्यामुळे तिचा या शर्यतीत पराभव झाले आणि तिचे आव्हान संपुष्टात आले. पण आव्हान संपुष्टात आल्यावरही दुतीने आता एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. दुतीने महिलांच्या २०० मी. धावण्याच्या शर्यतीत सातवे स्थान पटकावले. हे अंतर पूर्ण करण्यासाठी तिला २३.८५ सेकंदांचा वेळ लागला. त्यामुळे दुतीने आता या मोसमातील आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. कारण या मोसमातील भारतीय धावपटूने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचे आता समोर आले आहे. त्याचबरोबर दुतीने केलेली ही तिची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे. आतापर्यंत आपली या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करत दुतीने चांगला खेळ केला, पण या शर्यतीत सातवी आल्यामुळे तिची उपांत्य फेरी हुकली आहे. या शर्यतीमध्ये जर तिने सहावा क्रमांक पटकावला असता तर तिला उपांत्य फेरीत धावण्याची संधी मिळाली असती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fmN7gV
No comments:
Post a Comment