Breaking

Friday, August 27, 2021

खडसेंची मालमत्ता जप्त: जळगावातून 'ही' वेगळीच माहिती आली समोर https://ift.tt/38kvkmE

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना ईडीने दणका दिल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे ५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जळगावातील नेमकी कोणती मालमता जप्त झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही. महसूल विभागही अशा कुठल्याही कारवाईबाबत अनभिज्ञ आहे. ( ) वाचा: येथील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी कडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे जावई यांना ईडीने अटक केली आहे. पत्नी यांनाही ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मंदाकिनी खडसेंनी वेळ मागून घेतला आहे. दुसरीकडे, स्वतः खडसेंची या प्रकरणात दोनवेळा चौकशी झाली आहे. यातच शुक्रवारी ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे ५ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पण ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेपैकी जळगावातील नेमक्या कोणत्या मालमत्तेचा समावेश आहे, याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. वाचा: ईडीने केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईसंदर्भात जळगाव आणि मुक्ताईनगर येथील तहसीलदारांशी संपर्क साधला असता त्यांनी महसूल विभागाकडे अशा स्वरूपाच्या कारवाईबाबतचे कोणत्याही प्रकारचे पत्र आलेले नाही. जप्त केलेली मालमत्ता देखील आपल्या कार्यक्षेत्रातली नाही, असे त्यांनी सांगितले. ईडीने शेतजमिनीशी संबंधित मालमत्ता जप्त केली असेल तर अशा स्वरूपाची कारवाई करण्यापूर्वी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतचे पत्र दिले जाते. जप्त होणाऱ्या मालमत्तेचा तपशील त्यात असतो. संबंधित मालमत्तेवर महसूल विभागाचा बोजा बसवला जातो. मात्र, घर, बँकेतील रोकड व इतर ऐवज अशा स्वरूपाची जप्ती असेल तर मात्र ईडी थेट कारवाई करू शकते, असेही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gCPmxg

No comments:

Post a Comment