नवी दिल्ली : बांगलादेशच्या संघाने आज इतिहास रचला. कारण आतापर्यंत त्यांना ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलं नव्हतं. पण पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला धुळ चारली आणि इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला तो गोलंदाज नसुम अहमद. कारण नसुमने यावेळी भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे कंबरडेच मोडल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशने यावेळी प्रथम फलंदाजी करताना १३१ धावा केल्या. बांगलादेशकडून यावेळी सर्वाधिक ३६ धावा शकिब अल हसनने केल्या. यावेळी मोहम्मद नइमने ३० धावांची खेळी साकारली. बांगलादेशचा संघ यावेळी जिंकू शकेल, असे वाटत नव्हते. पण बांगलादेशच्या संघाने यावेळी ऑस्ट्रेलियाला १०८ धावांवर ऑल आऊट केले आणि इतिहास रचला. आतापर्यंत बांगलादेशला ऑस्ट्रेलियावर ट्वेन्टी-२० सामन्यात कधीही विजय मिळवता आला नव्हता. पण आजच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्यांनी ही किमया करून दाखवली आहे. अहमदने आजच्या सामन्यात १९ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळेच बांगलादेशला हा विजय साकारता आला. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये चार ट्वेन्टी-२० सामने खेळवण्यात आले होते. पण या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियानेच विजय मिळवले होते आणि बांगलादेशच्या विजयाची पाटी कोरी होती. पण बांगलादेशने या पाचव्या सामन्यात दमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच विजय साकारल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आता पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत बांगलादेशने आता १-० अशी आघाडी घेतली आहे. पण यापुढेही विजय मिळवत बांगलादेश ही मालिका आपल्या नावावर करणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यामुळे आता या मालिकेकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर येत्या काही दिवसांनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकही खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या विजयानंतर बांगलादेशच्या संघाचे मानसीक बळ नक्कीच वाढलेले असेल. पण आता या मालिकेतील उर्वरीत सामन्यांमध्ये ते कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fnHG1p
No comments:
Post a Comment