Breaking

Thursday, August 26, 2021

दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अडवलं आणि झाला धक्कादायक खुलासा! https://ift.tt/3gBKjgt

: महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश अशा दोन राज्याच्या सीमेवर वसलेल्या धारणी तालुक्यातून अमली पदार्थ मोठ्या शहरापर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. अशातच गुरुवारी अमरावती-बऱ्हाणपूर या आंतरराज्यीय महामार्गावर धारणी पोलिसांच्या पथकाने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना अडवलं. त्यानंतर केलेल्या तपासणीत या तरुणांकडे ४२ किलोग्रॅम गांजा सापडला आहे. अर्पित संजय मालवीय ( २५ ) रा. कवडाझिरी, सय्यद अली सय्यद हासम ( ३० ) रा. दुबई मोहल्ला धारणी अशी या अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुण हे अमली व मादक पदार्थांच्या तस्करीत असून त्यांच्या अटकेनंतर गांजा व्यवसायातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डिबी स्कॉड प्रमुख पीएसआय मंगेश भोयर, अमलदार चंद्रशेखर पाठक, आशिष मीटनकर, जगन तेलगोटे, राहुल रेवस्कर, वंदना तायडे यांच्यासह चालक संजय मिश्रा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, धारणी पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुद्ध एन. डी. पी. एस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पोलीस दप्तरी कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते हे करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38g8WuD

No comments:

Post a Comment