Breaking

Sunday, August 8, 2021

'कुणाची हेअरस्टाईल कॉपी करतो'; गोल्डन बॉय नीरजनं स्वत: केला खुलासा https://ift.tt/3jALq0H

: टोकियो : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला. त्याची हेअरस्टाईलही अनेकांना आवडली आहे. नीरजने पदक जिंकताच त्याचे जुने फोटो खूप व्हायरल झाले. काहींनी त्याला तिच हेअरस्टाईल कायम ठेव अशी विनंतीही केली आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रेझेंटर जतीन सप्रूने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो नीरजला त्याच्या हेअरस्टाईलबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. स्टार स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जतीनने नीरजची एक छोटीशी मुलाखत घेतली आणि या दरम्यान त्याच्या हेअरस्टाईलबद्दल चर्चा झाली. जतीनने नीरजला त्याच्या हेअरस्टाईलबद्दल विचारले. इतरांप्रमाणेच जतीनलाही नीरजने कुणाची हेअरस्टाईल कॉपी केली आहे, तो कुणाला फॉलो करतो हे प्रश्न पडले होते. त्यामुळे जतीनने विचारले की, 'शाहरुख खान की ईशांत शर्मा या दोघांपैकी तू कोणाची हेअरस्टाईल फॉलो केली आहे?' जतीनने हा प्रश्न विचारल्यानंतर नीरजला हसू आलं आणि तो म्हणाला की, मी कुणाचीच हेअरस्टाईल फॉलो केली नाही, ही माझी स्वत:ची हेअरस्टाईल आहे.' नीरजच्या या उत्तरानंतर तिथे उपस्थित लोक हसायला लागले. या व्हिडिओवर नीरजचे चाहतेही आता प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. नीरजच्या हेअरस्टाईलबद्दल सध्या सोशल मीडियात तुफान चर्चा होत आहे. आकर्षक केशरचनेतील त्याचे जुने फोटो सध्या व्हायरल होत आहेत. नेटकरीही त्याच्या प्रेमात पडले आहेत. टोकियो ऑलिम्पिकआधी नीरजने त्याचे केस कापण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेआधी थोडं अस्वस्थ वाटत असल्याने त्याने हेअरस्टाइल बदलण्याचे ठरवले. आपल्या आवडत्या गोष्टीच्या त्याग केल्यानंतर नीरजचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. हरियाणातील एका छोट्या गावातून आलेल्या नीरजने टोकियोमध्ये सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरज हा भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासातील पहिला खेळाडू आहे, ज्याच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये पहिले आणि एकमेव सुवर्णपदक जिंकण्याची नोंद झाली आहे. नीरजने आपल्या कामगिरीच्या जोरावर करोडो भारतीयांची मने जिंकली आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WXw7HJ

No comments:

Post a Comment