Breaking

Sunday, August 1, 2021

घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड वाहतुकीसाठी खुला; अर्ध्या तासाचा वेळ वाचणार https://ift.tt/3jbw6aP

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई नामकरणावरून मागील महिनाभर गाजत असलेल्या घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या पुलामुळे , पूर्व द्रुतगती महामार्ग, सीएसएलआर येथे होणारी वाहतूककोंडी टळणार असून, सुमारे अर्ध्या तासाचा वेळ वाचणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून उपयुक्त आणि आखीव-रेखीव विकासकामे करणे आवश्यक असते. या उड्डाणपुलाने प्रवासातला वेळ वाचण्याचा विचार केला तसा पुलाच्या आजुबाजूच्या वसाहतींना चांगली घरे देण्यासाठीदेखील करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. काही दिवसांपासून या उड्डाणपूल मार्गाने येणे सोडले होते. आज या मार्गावर आल्यानंतर यावरून पुन्हा पुन्हा यावे असे वाटते. या उड्डाणपुलाचे पुन्हा भूपृष्ठीकरण (सरफेसिग) करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. लोकार्पण झाले, नामकरण रखडले या उड्डाणपुलाला भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे, तर सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यावरून महिनाभर मोठा वाद पेटला होता. अखेरीस या पुलाला शिवरायांचे नाव देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत (शहर) मंजूर झाला. मात्र हा प्रस्ताव अद्याप पालिका सभागृहात मंजूर झाला नसल्याने लोकार्पण शिळेवर 'वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील उड्डाणपूल' असा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत कोटक यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेत्यांना डावलले या कार्यक्रमात पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांना डावलण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले याचा आदर आहे. मात्र हा कार्यक्रम पालिकेने आयोजित केला आहे. त्यामुळे पालिकेतील घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्याला व सर्व गटनेत्यांना निमंत्रण देणे आवश्यक होते. वैधानिक दर्जा असलेल्या या पदाचा प्रशासनाकडून झालेला अपमान सहन केला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया राजा यांनी व्यक्त केली. उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये - घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता हा सायन-पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोहोंना जोडणारा मुख्य रस्ता. - पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांच्या वाहतूककोंडीला उतार मिळणार. - हा उड्डाणपूल शिवाजीनगर, बैंगनवाडी, देवनार डम्पिंग ग्राऊंड व मोहिते-पाटीलनगर हे चार महत्त्वाचे जंक्शन व देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पीएमजीपी अशा तीन मोठ्या नाल्यांवरून जातो. - पुलाची एकूण लांबी २.९९१ किमी, रुंदी २४.२ मीटर - उत्तरेला तीन व दक्षिणेला तीन अशा एकूण सहा मार्गिका. - या उड्डाणपुलाचे बांधकाम खंडजोड (सेगमेंट) तंत्रज्ञान व एकल स्तंभ पद्धतीने केल्याने पुलाखालील रस्त्याच्या मार्गिका वाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3C53NTP

No comments:

Post a Comment