मुंबई: आणि दैनंदिन रुग्णसंख्या जास्त असलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यात , सातारा आणि या तीन जिल्ह्यांमध्ये स्थिती अजूनही गंभीर असून येत्या काळात या जिल्ह्यांत निर्बंध आणखी कठोर केले जाऊ शकतात, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. ( ) वाचा: करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या २२ जिल्ह्यांना राज्य सरकारकडून निर्बंधांमधून मोठ्या प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला आहे. या आदेशात करोना पॉझिटिव्हिटी रेट आणि दैनंदिन रुग्णसंख्या अजूनही मोठी असलेल्या जिल्ह्यांबाबत मात्र कठोर भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. राज्यात सरसकट सर्वच जिल्ह्यांत लेव्हल तीनचे निर्बंध लागू होते. तेच निर्बंध अशा ११ जिल्ह्यांत कायम ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे येथे यापुढेही मर्यादित सवलती मिळणार आहेत. त्यातही तीन जिल्ह्यांबाबत आदेशात महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. वाचा: कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम राहणात असून त्यातील सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहेत. या तिन्ही जिल्ह्यांतील मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी रेट आणि दैनंदिन वाढती रुग्णसंख्या पाहता स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे याचा निर्णय घेतील, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्थितीचा आढावा घेऊन कडक सारखा निर्णय घेण्यासाठी एकप्रकारे सरकारकडून हिरवा कंदीलच दाखवण्यात आला आहे. वाचा: दरम्यान, राज्यात प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असली तरी करोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. आजही दररोज सहा ते सात हजारांच्या घरात नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळेच काही प्रमाणात सवलती दिल्या जात असताना जिथे रुग्णवाढ मोठी असेल तिथे कठोर निर्बंध तातडीने लावायचे, अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारची आहे. त्यामुळेच मोठा विरोध असूनही ११ जिल्ह्यांना निर्बंधांत अधिकची सवलत देण्यात आलेली नाही. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3iiuk8s
No comments:
Post a Comment