मुंबई: केंद्रीय मंत्री यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी बुधवारी रात्री राणे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व त्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. ( ) वाचा: महाराष्ट्रात मंगळवारी नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुख्यमंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने दाखल गुन्ह्यात राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेलं अटकनाट्य रात्री महाड कोर्टात राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर थांबल. मात्र, या घडामोडींनंतर राणे यांचा आक्रमक बाणा कायम आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार आशिष शेलार यांच्यासह राणे यांनी बुधवारी आपल्या मुंबईतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई कशी चुकीची होती हे सांगितले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेला थेट शब्दांत इशाराही दिला. या सगळ्या घडामोडींनंतर रामदास आठवले यांनी रात्री राणे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. वाचा: राणे यांना पाठिंबा देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. राणे यांच्यावर पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. मात्र, राणे हे अशा कारवाईने डगमगणारे नेते नाहीत. ते खंबीर आणि नीडर नेते आहेत. या प्रसंगात मी आणि माझा राणे यांच्या पाठिशी आहे, असे आठवले यांनी यावेळी सांगितले. या संपूर्ण प्रकाराची माहिती केंद्रीय गृहमंत्री यांना द्यायला हवी. राज्य सरकारने कशी चुकीची कारवाई केली ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचायला हवी, असा सल्लाही यावेळी आठवले यांनी राणे यांना दिला. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3muLmmk
No comments:
Post a Comment