Breaking

Saturday, August 7, 2021

भारत सरकारने स्पोर्ट्स बजेटमधून यावर्षी केली २३० कोटींची कपात https://ift.tt/3lH0wV9

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. भारताने या ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्णासह सात पदकांवर आपील मोहोर उमटवली. पण दुसरीकडे भारत सरकारने यावर्षी स्पोर्ट्स बजेटमध्ये तब्बल २३० कोटींची कपात केल्याचे आता समोर आले आहे. गेल्यावर्षी स्पोर्ट्स बजेटसाठी २७७५.९० कोटी रुपये देण्यात आले होते. पण यावर्षी मात्र यामध्ये जवळपास ८ टक्के एवढी कपात करण्यात आली आणि ही रक्कम २५९६.१४ कोटी एवढी करण्यात आली, म्हणजेच यावर्षी भारत सरकारने स्पोर्ट्स बजेटमध्ये २३०.१८ कोटी रुपयांची कपात केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकिकडे खेळाडूंचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या बजेटमध्ये कपात करायची, अशी टीका आता चाहते करत आहेत. कारण यावर्षी ऑलिम्पिक होणार हो सर्वांनाच माहिती होते. पण दुसरीकडे मात्र भारत सरकारने यावर्षीच स्पोर्ट्स बजेटमध्ये मोठी कपात केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता ही चुक भारत सरकार सुधारणार कधी, असा सवाल आता चाहत्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे यामध्ये सुधारणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारताताला जर ऑलिम्पिकमध्ये जास्त पदकं जिंकायची असतील तर दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध असायला हव्यात. भारताच्या मीराबाई चानुने भारतासाठी पहिल्याच दिवशी रौप्यपदक जिंकले, पण तिची अवस्था कशी आहे, हे सर्वांनी जाणून घ्यायला हवं. कारण बिकट परिस्थितीवर मात करत ती इथपर्यंत पोहोचली आहे. भारताला अजून बऱ्याच मीराबाईंची आणि पदकांची गरज आहे. त्यासाठी भारत सरकारने क्रीडा धोरणांमध्ये सुधारणा करायला हवी, त्याचबरोबर त्यासाठी लागणारा निधीही वाढवण्यात यायला हवा. कारण फक्त शुभेच्छांनी पोटं भरत नसतात आणि पदक जिंकल्यावर खेळाडूंना बक्षिस देण्यापेक्षा ते जेव्हा या पदकासाठी परीश्रम घेत असतात तेव्हा त्यांना मदत करणे सर्वात महत्वाचे असते. त्यामुळे भारत सरकार या गोष्टीवर गंभीरपणे विचार करेल, अशी आशा भारतीय क्रीडा चाहत्यांना आहे. त्यामुळे आता पुढच्यावर्षी स्पोर्ट्स बजेटमध्ये वाढ होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TZActR

No comments:

Post a Comment