2020 : टोकियो : खेळात नेहमीच विजय आणि पराभव होत राहणार. प्रत्येक दिवस प्रत्येक खेळाडूचा नसतोच. तसेच त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करता येईल असे नाही. असंच काहीसं टोकियोच्या बॅडमिंटन कोर्टवर पाहायला मिळालं. जगातील अव्वल महिला बॅडमिंटनपटू चीनी तैपेई खेळाडू ताई त्झू यिंगने सिंधूला पराभूत केल्यानंतर सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात होते. पण सुवर्णपदकाच्या सामन्यात तिला चीनच्या चेन युफेईकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे ताईला जोरदार धक्का बसला होता. तेव्हा सिंधूने तिला प्रोत्साहन देत तिचा आत्मविश्वास वाढवला. याबाबतचा खुलासा स्वत: ताईने केला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या चेन युफेई आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ताईमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोघींमधील सामना तीन सेट पर्यंत चालला. युफेईने पहिला सेट 21-18 जिंकला, दुसऱ्या गेममध्ये ताईने कमबॅक करत 21-19 असा सेट जिंकला. त्यानंतर चीनी युफेईने तिसरा सेट जिंकत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे ताईला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सिंधूला तोड नाही चीनी तैपेई खेळाडू ताईने पारितोषिक वितरण समारंभानंतरचा किस्सा सांगितला. ती म्हणाली की, अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर मी खूप निराश झाले होते. तेव्हा सिंधूने तिला प्रोत्साहन देत तिची हिंमत वाढवली. सिंधू माझ्याकडे धावत आली आणि माझा चेहरा तिने हातांनी उचलून धरत म्हणाली की, मला माहीत आहे तू सध्या निराश आहेस. तुझ्या मनात सध्या काय विचार येत असतील. पण तू खूप छान खेळ खेळलीस. आज फक्त तुझा दिवस नव्हता. त्यानंतर सिंधूने मला मिठी मारली आणि मला सगळं समजतंय असं म्हणाली. सिंधूच्या या शब्दांनी तिला धीर आला, असं ताई म्हणाली. टोकियोनंतर निवृत्तीचे संकेत जगभरात ताईचे चाहते आहेत. तिला टोकियोमध्ये सुवर्ण पदक जिंकायचे होते. अवघी 27 वर्षांची असलेल्या ताईने टोकियो ऑलिम्पिकनंतर निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मी अर्ध आयुष्य बॅडमिंटन खेळले आहे. आता उर्वरीत आयुष्यात दुसरं काहीतरी करण्याचा विचार करत आहे, असं ताई म्हणाली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jdZRaQ
No comments:
Post a Comment