Breaking

Monday, August 2, 2021

...म्हणून जन्मदात्या आईनेच २ वर्षाच्या मुलीची गळा दाबून केली हत्या https://ift.tt/3loTvYM

: संजयनगरमधील दडगे प्लॉट येथे दोन वर्षाच्या मुलीचा जन्मदात्या आईनेच गळा घोटल्याचं आज उघडकीस आले. मुलगी दिव्यांग असल्याने तिच्या आईनेच एका हाताने गळा आणि दुसऱ्‍या हाताने तोंड दाबून तिचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर संजयनगर पोलिसांनी संशयित रेवती संजय लोकरे (वय २६) हिला अटक केली आहे. संजयनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दडगे प्लॉटमध्ये आई, आजी, आत्या आणि चुलत्यांसमवेत राहणाऱ्‍या ज्ञानदा संजय लोकरे (वय २) हिचा काल दुपारी अचानक मृत्यू झाला होता. घरात एकटीच खेळत असताना तिचा मृत्यू झाल्याचे आई रेवती हिने सांगितले. ती खेळताना अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगत रेवतीने मुलगी ज्ञानदाला बालिकेला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ज्ञानदा घरात एकटीच खेळत होती, त्यावेळी आपण बाहेर होतो, असा दावाही संशयित आरोपी रेवती हिने नातेवाईकांकडे केला होता. दरम्यान, मृत बालिकेच्या गळ्यावर व्रण आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनानुसार संजयनगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक काकासाहेब पाटील आणि त्यांच्या पथकाने संशयावरुन रेवती लोकरे हिला ताब्यात घेतले. काल रात्री तिची कसून चौकशी केली. त्यावेळी तिने मुलीच्या खुनाची कबुली दिली. ज्ञानदा ही दिव्यांग होती. तिला बोलता येत नव्हते, म्हणून तिचा खून केल्याचे रेवती हिने मान्य करताच पोलिसांनी तिला अटक केली. घरात मुलगी एकटीच असल्याची संधी साधून रेवतीने एका हाताने ज्ञानदाचा गळा दाबला, तर दुसऱ्‍या हाताने तिचे तोंड दाबल्याचे आरोपी आईने कबुल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, आरोपी रेवती लोकरे हिचा पती पुणे येथे खासगी कंपनीत काम करत असून, रेवती आणि तिची मुलगी ज्ञानदा या सांगलीत सासू, नणंद आणि दीर यांच्यासह राहात होत्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Vt9IBf

No comments:

Post a Comment