Breaking

Tuesday, August 24, 2021

'त्या' व्हायरल मेसेजमुळं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली; जाणून घ्या सत्य https://ift.tt/3msEwxx

म. टा. प्रतिनिधी, : गणेशोत्सव अवघ्या २ आठवड्यांवर असताना मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई या मार्गावर रेल्वे प्रवासासाठी सुस्पष्ट नियम अद्याप जाहीर झालेले नाही. समाज माध्यमांवर कोकणातील रेल्वे प्रवासासाठी आरटीपीसीआरचा नियम लागू असल्याचे मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे अहवाल गरजेचा आहे की नाही, या संभ्रमात सामान्य चाकरमानी आहे. त्यामुळे या संदर्भात राज्य सरकारकडून स्पष्ट सूचनांनी प्रतीक्षा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये देखील सामान्य नागरिकांना प्रवास नाकारण्यामागे गर्दी रोखणे हेच कारण देण्यात येत आहे. तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. कर्नाटकातून मुंबई महाराष्ट्रात येण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. त्या धर्तीवर गणपती काळात मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई या मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक असणार आहे, असा व्हायरल मेसेज सध्या चाकरमान्यांची चिंता वाढवत आहेत. उत्सव काळात कोकण मार्गावरील बहुतांशी प्रवासी मध्य रेल्वेहून प्रवास करतात. गणपती विशेष प्रवासाच्या नियमांबाबत मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क साधला असता, ' गणपती विशेष प्रवासासाठी नवे कोणतेही नियम आलेले नसून सध्या सुरू असलेल्या नियमांप्रमाणेच रेल्वे प्रवास करता येईल. राज्य सरकारने नवे नियम लागू केल्यास त्याची माहिती घेऊन अधिक बोलणे योग्य ठरेल,' असे त्यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WfLFa4

No comments:

Post a Comment