Breaking

Friday, August 6, 2021

फडणवीस, शेलारांची शहांसोबत दिल्लीत गुप्त बैठक, चंद्रकांत पाटीलही दिल्लीला जाणार https://ift.tt/3yvZ7o2

नवी दिल्लीः भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत विरोधी पक्षनेते यांची गुप्त बैठक झाली. त्यापूर्वी आणि अमित शहांची स्वतंत्र बैठक झाली. आधी देवेंद्र फडणवीस आणि मग अशिष शेलार अमित शहांना भेटले, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येत आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष हे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तेही अमित शहांना भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे तीन बडे नेते एकामागून एक अमित शहांची भेट घेत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपची कुठल्या मुद्द्यावर खलबतं सुरू आहेत? असा प्रश्नही विचारला जातोय. महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतल्याने अमित शहांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गेल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास ४ वेळा पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या भेटी घेतल्या. आशिष शेलारही दिल्लीत जाऊन भेटले. आता चंद्रकांत पाटील हे शनिवारपासून ४ दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तेही अमित शहांना भेटणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येतंय. दरम्यान, फडणवीस आणि शेलार यांच्या दिल्ली भेटीबाबत गुप्तता बाळगली जात आहे, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगितलं जात आहे. या भेटी मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्याने भाजप-मनसे युतीबाबत चर्चा रंगली आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसह इतरही महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. यामुळेच दिल्लीत आता वरिष्ठ नेतृत्वाकडून पुढील दिशा ठरवण्यासाठी चाचपणी करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3xs8Muw

No comments:

Post a Comment