ट्रेंट ब्रिज : लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी दमदार सलामी भारताला करून दिली होती. पण त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे एकामागून एक लवकर बाद झाले आणि भारतीय संघाची दैना उडाल्याचे पाहायला मिळाले. पण लोकेश राहुलच्या अर्धशतकामुळे भारताला दुसऱ्या दिवसअखेर १२५ धावांपर्यंत तरी मजल मारता आली. पण तरीही भारतीय संघ अजूनही पिछाडीवरच आहे. रोहित आणि राहुल यांनी दुसऱ्या दिवसाची चांगली सुरुवात भारताला करून दिली. कालच्या बिनबाद २१ या धावसंख्येवरून या दोघांनी दमदार सलामी देत ९७ धावांची भागीदारी रचली. यावेळी हे दोघे भारताला मोठी धावसंख्या उभारून देतील असे वाटत होते. पण त्यावेळी स्थिरस्थावर झालेला रोहित शर्मा बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला. रोहितने यावेळी सहा चौकारांच्या जोरावर ३६ धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यावर भारताचा डाव कोसळायला सुरुवात झाली. रोहित बाद झाल्यावर काहीच वेळात पुजाराही बाद झाला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने यावेळी पुजाराला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. पुजारा बाद झाल्यावर दुसऱ्याच चेंडूवर कोहलीदेखील बाद झाला. कोहलीला यावेळी भोपळाही फोडता आला नाही, पहिल्याच चेंडूवर कोहली 'गोल्डन डक' झाल्याचे पाहायला मिळाले. एकामागून एक तीन फलंदाज बाद झाल्यावर अजिंक्यकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण अजिंक्य यावेळी चाहत्यांच्या अपेक्षेला पात्र ठरू शकला नाही. कारण धावचीत होत अजिंक्य झाला. त्यामुळे एकेकाही बिनबाद ९७ वरुन भारताची धावसंख्या ४ बाद ११२ अशी झाली होती. भारताने फक्त १५ धावांमध्ये आपले चार नावाजलेले फलंदाज गमावले होते. भारताची पडझड होताना एकच गोष्ट चाहत्यांना आनंद देणारी होती आणि ती म्हणजे लोकेश राहुलने झळकावलेले अर्धशतक. भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना राहुलने मात्र दमदार फलंदाजी करत आपले अर्धशतक साकारले. राहुलने यावेळी दिवसअखेरपर्यंत भारताचा किल्ला लढवला आणि ९ चौकारांच्या जोरावर नाबाद ५७ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताला दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १२५ अशी मजल मारता आली असून संघ अजूनही ५८ धावांनी पिछाडीवर आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3CmsyuU
No comments:
Post a Comment