Breaking

Friday, September 3, 2021

ENG vs IND: इंग्लंडने झुंजवले; दुसऱ्या डावात भारताची दमदार सुरूवात https://ift.tt/2VhUm34

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात विकेट न गमावता ४३ धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा २० तर केएल राहुल २२ धावांवर नाबाद खेळत आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतल्याने भारत अद्याप ५६ धावांनी पिछाडीवर आहे. वाचा- वाचा- भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा पार केला. त्याने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावा पूर्ण केल्या. वाचा- वाचा- दुसऱ्या दिवशी इंग्लंडने कालच्या ३ बाद ५३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. उमेश यादवने ओव्हरट आणि डेव्हिड मलान यांना बाद करत इंग्लंडला दोन धक्के दिले. यामुळे त्यांची अवस्था दोन बाद ६२ अशी होती. भारत सामन्यावर पकड मिळवणार असे वाटत होते. पण इंग्लंडच्या मधल्या आणि तळातील फलंदाजांनी भरपुर धावा केल्या. ओली पोपने प्रथम जॉनी बेयरस्टोसह, नंतर मोईन अली आणि ख्रिस वोक्ससह महत्त्वाची भागिदारी केली. पोपने ८१, बेयरस्टोने ३७, अलीने ३५ आणि वोक्सने ५० धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव २९० धावात संपुष्टात आला. त्यांनी पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन, शार्दुल आणि सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. वाचा- दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने विकेट न गमावता ४३ धावा केल्या आहेत. भारत अद्याप ५६ धावांनी पिछाडीवर असला तरी त्यांच्याकडे १० विकेट हातात आहेत ही सर्वात मोठी जमेची बाजू असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3DN4jHd

No comments:

Post a Comment