Breaking

Wednesday, September 1, 2021

अनिल देशमुखांच्या जावयाची चौकशी; रस्त्यातच सीबीआयनं घेतले ताब्यात https://ift.tt/2WLWFvn

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई माजी गृहमंत्री यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना बुधवारी सीबीआयने ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र कोणतीही पूर्वकल्पना अथवा नोटीस न देता त्यांना ताब्यात घेतल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. काही वेळाने सीबीआयने चौकशी करून त्यांना सोडल्यानंतर ते वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे रात्री उशिरापर्यंत अपहरणाच्या तक्रारीवरून नाट्य सुरू होते. वरळी येथील 'सुखदा' इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी बुधवारी आले होते. सायंकाळी चतुर्वेदी बाहेर पडले असता, त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयने एका वकिलासह ताब्यात घेतले. सुमारे दहा जणांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईनंतर देशमुख कुटुंबीयांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप करण्यात आला. काही लोकांनी गौरव यांचे अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी देशमुख कुटुंबीय वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले. हे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच काही वेळाने गौरव हे काही अधिकाऱ्यांसह वरळी पोलिस ठाण्यात दाखल झाले. गौरव यांना नेमके कशासाठी ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना का सोडले याबाबत सीबीआय अधिकाऱ्यांकडून काहीच ठोस माहिती मिळू शकली नाही. अनिल देशमुख प्रकरणात गौरव चतुर्वेदी यांचे नाव यापूर्वी कधीही आले नव्हते. मात्र, आता अचानक त्यांना ताब्यात घेण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर हा अहवाल कसा फुटला, याची सीबीआयमार्फत चौकशी केली जात होती. ही चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गौरव आणि वकील दबाव आणत होते आणि त्यामुळेच दोघांना ताब्यात घेतले गेले, असेही म्हटले जात आहे. राष्ट्रवादीचा संताप अनिल देशमुख यांच्या कन्या, जावई व सून बुधवारी संध्याकाळी गाडीने जात असताना त्यांची गाडी १०-१२ जणांनी अडवली व त्यांचे जावई व वकिलांना परस्पर घेऊन गेले, असा आरोप स्वतः अनिल देशमुख व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे काय, याविषयी शंका आल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीही काही माहिती देण्यास सुरुवातीस नकार दिल्याचे राष्ट्रवादीने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mSeF2f

No comments:

Post a Comment