: शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीनं मांजरा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ही तरुणी वाहून गेली असून तिचा शोध सुरू आहे. पल्लवी साबळे असं पाण्यात नदीत उडी घेतलेल्या तरुणीचं नाव असून ती लातूर शहरातील गायत्री नगर येथील रहिवासी आहे. पल्लवीने शनिवारी २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नदीत उडी घेतली. सदर तरुणीने पुलावरून नदीपात्रात उडी घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर लातूर मनपाचे आपत्ती व्यावस्थापन पथक व रेणापूर पोलिसांनी १० किलोमीटरपर्यंतच्या नदी पात्रात शोध घेतला. मात्र वाहून गेलेली तरुणी सापडली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही शोध कार्य सुरूच होते. सदर तरुणीने नदीत उडी घेण्यामागील कारण अद्याप समजू शकलं नाही. दरम्यान, या घटनेनंतर साबळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oaRQaE
No comments:
Post a Comment