Breaking

Tuesday, September 7, 2021

पालघरमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून रेड अलर्ट https://ift.tt/3DQlxn3

म. टा. विशेष प्रतिनिधी, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सोमवारी संध्याकाळपासून वाढलेला पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. हवामान विभागाकडून रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला. तर आज, बुधवारसाठी पालघर जिल्ह्यात रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी २४ तासांमध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची नोंद झाली. मुंबईमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या. मात्र आकाश दिवसभर ढगाळलेले होते. आज, बुधवारी मुंबई आणि ठाण्यातही ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी छत्तीसगडजवळ होते. मंगळवारी सकाळी ८.३०पर्यंत झालेल्या नोंदीनुसार २४ तासांमध्ये राज्यात मुरुड येथे सर्वाधिक ४७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीमध्ये हर्णे येथे ३६८ तर दापोली येथे ३५७ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. दिवसभरात सातारा, परभणी, नांदेड, बुलडाणा अशा विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला. परभणीमध्ये दिवसभरात ६२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली तर रत्नागिरीमध्ये संततधार होती, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत दिवसभर आभाळ ढगाळलेले होते. दिवसभरात सांताक्रूझ येथे ३.६ आणि कुलाबा येथे ०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवार सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (मिलीमीटरमध्ये) रायगड जिल्हा मुरुड : ४७५ श्रीवर्धन : १५३ माथेरान : १०५ ......... रत्नागिरी जिल्हा चिपळूण : २०७ दापोली : ३५७ गुहागर : १३५ हर्णे : ३६८ लांजा : १०२ संगमेश्वर-देवरुख : १४० ..... कोल्हापूर जिल्हा गगनबावडा ९५


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38RPNzD

No comments:

Post a Comment