Breaking

Sunday, September 5, 2021

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल सापडल्याने खळबळ https://ift.tt/3DQxf0V

म. टा. प्रतिनिधी, : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध पुरावे देणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर करत, परळी शहरामध्ये आलेल्या यांना काही महिलांनी रविवारी घेराव घातला. यातच, शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. तर, 'पिस्तुल माझे नसून, मला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक हे पिस्तुल गाडीत टाकले आहे,' असा आरोप शर्मा यांनी केला. परळी येथे येऊन धनंज मुंडे यांच्याविरोधातील पुरावे पत्रकार परिषदेत देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, त्या दुपारी परळीमध्ये आल्या. त्यांनी सुरुवातीला वैद्यनाथ देवस्थानच्या पायरीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांच्या जमावाने त्यांना घेराव घातला. 'धनंजय मुंडे यांची बदनामी का करत आहात,' असा जाब विचारत या महिलांनी त्यांना अडवले. त्या वेळी महिलांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. जमावाने त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्नही केला. तर, तुम्ही पैसे घेऊन मला विरोध करत आहात, असा आरोप करत करुणा शर्मा यांनी मारहाण केल्याची तक्रार विशाखा घाडगे व गुड्डी तांबोळी या दोन महिलांनी पोलिसांत दिली. त्यावरून, करुणा शर्मा यांच्यासह दोघांविरुद्ध परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत करुणा शर्मा यांना शहर पोलिस ठाण्यात नेले. याच काळात त्यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडले आणि खळबळ उडाली. गाडीत सापडलेल्या पिस्तुल प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. तर, हे पिस्तुल आपले नसून, अडचणीत आणण्यासाठी हे पिस्तूल गाडीत टाकले असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. दरम्यान, तोंडाला रुमाल बांधलेला एक जण गर्दीतून गाडीच्या मागील बाजूला काही तरी टाकत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे, या प्रकरणातील गुंतागूंत वाढली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3h8mTjk

No comments:

Post a Comment