Breaking

Sunday, September 26, 2021

...तर स्वत:चा घात होईल; झुंडशाहीविरोधात मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य https://ift.tt/3ETfQFl

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद फुले-शाहू-आंबेडकरांच्या भूमीत विवेकवादी कार्यकर्त्यांना गोळा घातल्या जात आहेत. नेहमी प्रागतिक विचारांच्या विरोधात असते. आपण आपल्याला वाचविण्याच्या नादात समाजाला वाचवू शकलो नाही, तर स्वत:चा घात होईल. प्रागतिक विचार म्हणजे लोकशाहीचा सन्मान आहे. लोकांना घातकी विचारांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचविण्यासाठी लेखक, सुजाण वाचकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री यांनी समारोप कार्यक्रमात केले. ( has said that is always against ) लोकसंवाद फाउंडेशन आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा रविवारी समारोप झाला. यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे, किरण सगर, डॉ. राम चव्हाण, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. चेतना सोनकांबळे आणि राधाबाई बिरादार उपस्थित होते. क्लिक करा आणि वाचा- मराठी साहित्य परंपरा आणि सद्यस्थितीवर आव्हाड यांनी विचार मांडले. ‘जातीय, धार्मिक अहंकार वाढत आहे. एक पिढी सोशल मीडियावर फॉरवर्डच्या नादात अडकली आहे. खिशातील मोबाईल तुमचा शत्रू झाला आहे. वास्तव समजून घेण्यापेक्षा फॉरवर्ड मेसेजवर विश्वास ठेवतात. क्रांती घडविणारी ताकद कमी झाली आहे. आर्य समाज, सत्यशोधक चळवळ, दलित चळवळी संपल्या आहेत. ढसाळ यांची कविता वाचून बंडखोरी कळते. लोकांना घातक विचारांपासून वाचविण्याची जबाबदारी लेखक व वाचकांची आहे’, असे आव्हाड म्हणाले. मराठीचा जन्म गोदावरीच्या खोऱ्यात झाला आहे. मराठवाडा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. साहित्यातून क्रांती घडविणारी मोठी यादी आहे. अनुराधा पाटील यांची कविता जनाबाई, बहिणाबाईंचा वारसा चालविणारी आहे, असे आव्हाड म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- शेतकऱ्यांना घरात शेतमाल आल्यानंतरच भाव कसे पडतात ? व्यापाऱ्यांना मदत कोण करते ? धोरणकर्ते योग्य काम करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परवड झाली आहे. मराठवाडा साहित्य परिषद भाषेचे मोठे काम करीत आहे. या संस्थेला मदतीची गरज आहे, असे ठाले पाटील म्हणाले. तर महत्त्वाचे निर्णय घेणारे अमित देशमुख, राजेश टोपे मराठवाड्यातीलच आहेत. मराठवाड्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले, असे म्हणून का असे आव्हाड यांनी ठालेंना प्रत्युत्तर दिले. डॉ. राजेश करपे यांनी संमेलन यशस्वी होण्यामागे लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. यावेळी दत्तात्रय बनसोडे लिखित ‘निवडुंग ते बोधिवृक्ष – स्वरूप आणि आकलन’, बाळासाहेब शेंदूरकर लिखित ‘कन्याकुमारी अप्रतिम निसर्ग’, श्रावण क्षीरसागर लिखित ‘निवडणूक’ आणि माधवी देवळाणकर लिखित ‘प्रिय – एक ओळ तुझ्यासाठी’ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संकेत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले आणि कुंडलिक अतकरे यांनी आभार मानले. क्लिक करा आणि वाचा- ‘एमआयएम’वर टीका मराठवाडा सामील होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पूर्ण होत नाही. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे ७५ वे वर्ष सुरू झाले आहे. मराठवाड्याला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाले. भारत सरकार सोबत असले तरी इथल्या लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळविले. अत्याचारी रझाकारांपासून मुक्तता मिळाली. पण, आता कासीम रिझवीला मानणारे लोक मराठवाड्यातील महापालिका आणि नगरपालिकेत राज्य करीत आहेत, हे दुर्दैव आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3CM8Yrs

No comments:

Post a Comment