दापोली: कोकणातील जिल्ह्यात दापोली तालुक्यातील कोंढे बौद्धवाडी येथे भयानक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. नातेवाईकाकडून एका ५६ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करून हत्या झाल्याची घटना घटना घडली आहे. मिलिंद काशिनाथ कासारे (वय ५६) यांची त्यांचे नातेवाईक संतोष कृष्णा कासारे (वय ३५) याने डोक्यात काठी व फरशीने (कु-हाड) वार करून खून केला. दारूच्या नशेत ही हत्येची घटना घडली आहे. या घटनेला पूर्वीच्या वादाची किनार असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार परवा बुधवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास घडला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (a person has been murdered by a relative at in ratnagiri) या प्रकरणातील संशयित आरोपीला गुरुवारी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्यांची हत्या करण्यात आली ते मिलिंद कासारे हे संतोष कासारे यांच्या घरी घेऊन गेले आणि शिवीगाळ करून तुमच्या घरातील सगळ्यांना मारून मेणबत्या लावतो असे शब्द उच्चारले, असा जबाब संशयित आरोपीने दापोली पोलिसांना दिला आहे. याचा आरोपी संतोष कासारे याला राग आला आणि त्यांनी घरातील काठी आणि फरशीने (कुऱ्हाड) मिलिंद कासारे यांच्या डोक्यात वार करून ठार केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार घडला तेव्हा संशयित आरोपीचा भाऊ मागील बाजूस झोपला होता. तर, आई चूल पेटवत होती. मात्र आरडाओरडा झाल्यावर येऊन पाहिले असता संतोष हातात कुऱ्हाड घेऊन उभा होता. यावेळी झोपेतून उठलेल्या भावाला हा प्रकार पाहून धक्का बसला. त्याने शेजाऱ्यांना हाक मारून बोलावले. संशयित आरोपी संतोष याने आपण मिलिंद याला मारुन टाकल्याचे सांगितले. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, दारूच्या नशेत हे भयानक कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yCsJiF
No comments:
Post a Comment