Breaking

Friday, September 3, 2021

पक्षात बढती मिळताच 'दादा' गटाच्या विशाल पाटलांचे भाजप खासदाराला आव्हान https://ift.tt/3h287dD

तील काँग्रेसचे युवा नेते यांची काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. यानंतर आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातून विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांना आव्हान दिले आहे. यापुढे अनुकंपा तत्त्वावर नाही, तर मेरीटवर उमेदवारी मिळवू आणि जिंकूनही दाखवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विशाल पाटील यांना काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संधी मिळाल्याने वसंत दादा पाटील गटाला बळ मिळाले आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीतील लढतीचे संकेतही मिळाले आहेत. काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी सांगलीतील स्वर्गीय वसंत दादा पाटील गट आणि स्वर्गीय पतंगराव कदम गटात जोरदार चुरस होती. जिल्हाध्यक्ष पदासाठी डावलले तर विशाल पाटील हे बंडखोरी करतील, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विशाल पाटील यांना प्रदेश उपाध्यक्षपदी संधी दिली. तर जिल्हाध्यक्षपदी आमदार विक्रम सावंत यांची निवड झाली. या निवडीने पाटील व कदम या दोन्ही गटांतील संघर्ष टळला. विशाल पाटील यांच्या निवडीच्या निमित्ताने स्वर्गीय वसंत दादा पाटील घराण्याला पुन्हा एकदा राज्य पातळीवरील राजकारणात संधी मिळाली आहे. निवडीनंतर आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विशाल पाटील यांनी त्यांची आगामी राजकीय दिशा स्पष्ट केली. यापुढे मेरीटवर उमेदवारी मिळविण्यासह विजय खेचून आणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्ता मेळावाच्या निमित्ताने त्यांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये अनुकंपा तत्वावर एकवेळच उमेदवारी मिळते. त्यामुळे यापुढे वारसा हक्काने नव्हे, तर कर्तृत्वाने उमेदवारी मिळवून पुढे जाणार आहे. प्रदेश उपाध्यक्ष ही पायरी आहे. यापुढे लढणार आणि जिंकणारच. गेल्या काही महिन्यांपासून खासदार पाटील यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत सलगी वाढली आहे. यावरही विशाल पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'पंतप्रधान मोदींच्या नावावर निवडून आलेले सांगलीचे खासदार आता नव्या पक्षातून संधीच्या शोधात आहेत. यामुळे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत सलगी करत आहेत. मात्र आता याचा काहीच उपयोग होणार नाही.' विशाल पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील लढतीचे संकेत मिळत असल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3BFIDL1

No comments:

Post a Comment