Breaking

Monday, September 6, 2021

केंद्रीय मंत्री नक्वी, इराणी माटुंग्यातील भोजनालयात; मारला डोसा आणि वडापाववर ताव https://ift.tt/3h3gTs3

मुंबई: केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री (mukhtar abbas naqvi) आणि महिला व बालविकास मंत्री (smriti irani) सध्या मुंबईत असून त्यांनी माटुंगा येथील एका भोजनालयात मसाला डोसा आणि वडापावर यथेच्छ ताव मारला. (union ministers and eat vada pav in a eatery in matunga in mumbai) आमच्या भोजनालयात केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास आणि स्मृती इराणी आल्या. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच ते भोजनालयात बसून खात होते. आपल्या बाजूला बसून दोन केंद्रीय मंत्री आवडत्या पदार्थांवर ताव मारत असल्याचे पाहून भोजनालयात आलेल्या सर्वसामान्य लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. येथे त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रिटमेंट मिळालेली नाही, असे माटुंग्यातील या भोजनालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. क्लिक करा आणि वाचा- पोषण जागरुकता अभियान या कार्यक्रमासाठी नक्वी आणि इराणी मुंबईत आले आहेत. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या संयुक्त सहभागातून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी धारावीत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्राला भेट दिली. तेथे त्यांनी लाभार्थ्यांशी चर्चा केली, तसेच त्यांच्या घरी देखील भेट दिली. क्लिक करा आणि वाचा- इराणी यांनी आयसीडीएस येथे डिजिटल गुड्डी गुड्डा बोर्डचे उद्घाटन देखील केले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत जन्मदराची माहिती अद्ययावत करणे, देखरेख करणे आणि ती माहिती दाखवण्यासाठी या बोर्डचा वापर होतो. बोर्डावर अभियानाबाबतची माहिती आणि शैक्षणिक साहित्याबाबत माहितीही दिली जाते. याचा उपयोग अभियानाचा प्रचार करणे आणि उपयुक्त माहिती देत राहणे यासाठी देखील बोर्डाचा वापर केला जातो, अशी माहिती अभियात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिली. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38IpfAz

No comments:

Post a Comment