: घराशेजारी असलेल्या तरुणासोबत मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या कारणातून दिराने भावजयीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुनाच्या घटनेनंतर दिराने भावजय घरात जिन्यावरून पडल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. पलूस तालुक्यातील बुर्ली येथे गुरुवारी घडलेला प्रकार शनिवारी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी संशयित कुणाल पवार (वय २८) याला पलूस पोलिसांनी अटक केली आहे. सायली केतन पवार (वय २२) असं मृत महिलेचं नाव आहे. पलूस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्ली येथील सायली पवार या विवाहित तरुणीने शेजारी राहणाऱ्या तरुणाशी मोबाईलवरून चॅटिंग केल्याचा आणि त्याला भेटल्याचा दिर कुणाल याला संशय होता. गुरुवारी रात्री उशिरा सायली ही बेडरूममध्ये एकटी असल्याचं पाहून कुणालने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. तिच्या गळ्यावर आणि दोन्ही हातांवर वार केले. यात अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. मात्र ती घरात जिन्यावरून पडल्याचा बनाव करत मध्यरात्रीच्या सुमारास तिला उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, गुरुवारी रात्रीच कुणाल पवार यांच्या घराशेजारील श्रेयस पवार या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून सायली पवार हिचा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी शनिवारी कुणाल पवार याला अटक केली. कोर्टात हजर केले असता, त्याला २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तासगाव येथील विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव आणि सहकार्यांनी या खुनाचा उलघडा केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AIkXWq
No comments:
Post a Comment