Breaking

Thursday, September 2, 2021

त्यांना चैन, मौजमजा करायची होती; केली १४ दुचाकींची चोरी, झाले गजाआड https://ift.tt/3jEK9Hj

म. टा. प्रतिनिधी, सांगली चैनी आणि मौजमजा करण्यासाठी दुचाकींची चोरी करून कमी पैशात त्यांची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. चोरीतील दुचाकी विकत घेणाऱ्या संशयितालाही पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. अटकेतील चौघांकरून पोलिसांनी १४ दुचाकी हस्तगत केल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून, अटकेतील सशयितांंकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली शहरासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. शहरात रोज तीन ते चार दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वतंत्र पथक तयार करून चोरट्यांचा शोध सुरु केला होता. क्लिक करा आणि वाचा- पथकातील पोलिस नाईक सागर टिंगरे यांना काही संशयितांना बद्दल माहिती मिळाली होती. यानुसार नेमिनाथनगर येथील मैदानात थांबलेल्या तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे चोरीच्या दुचाकी मिळाल्या. अधिक तपासात त्यांनी सांगली शहरासह परिसरात १४ दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीतील सर्व दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सुमित मारुती सिंदगी (वय १९, रा. माधवनगर), आशिष गजानन मोरे (वय १९, रा. विश्रामबाग), अनिस यासिन मुजावर (वय १९, रा. चैतन्यनगर) तसेच चोरीच्या दुचाकी विकत घेणारा अभिषेख शामराव देवकुळे (वय २०, रा. तासगाव) यांना अटक केली. क्लिक करा आणि वाचा- अनिस मुजावर व त्याचा साथीदार यांनी चोरलेल्या दुचाकी तासगांव येथे त्यांच्या मित्रास दिल्या असल्याने त्याचा मित्र अभिषेक देवकुळे याच्या घरावर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी चोरीतील दुचाकी हस्तगत केल्या. या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी व त्यांचे साथीदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून एकूण १४ दुचाकी चोरी केल्या असून त्यांच्याकूुन मोटरसायकल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3yGja2r

No comments:

Post a Comment