म. टा. प्रतिनिधी, १०० कोटी रुपये खंडणी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे आता देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्याआधारे सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासान्वये 'ईडी'नेसुद्धा पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत 'ईडी'ने आत्तापर्यंत पाच वेळा देशमुख यांना चौकशीचे समन्स बजावले. मात्र देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी 'ईडी'ने केली आहे, पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. 'ईडी'तील सूत्रांनुसार, 'लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल.' दरम्यान, अनिल देशमुख यांच्या शोधासाठी 'ईडी'ने आत्तापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. 'ईडी'ची तीन पथके एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. आता लूकआऊटमुळे लवकरच परराज्यातदेखील 'ईडी'कडून शोध सुरू होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकरणात सुमारे साडेचार कोटी रुपयांची खंडणी देशमुख यांना मिळाली असून ती रक्कम त्यांनी बनावट कंपन्यांमार्फत शैक्षणिक संस्थांमध्ये वळवली, असे 'ईडी'च्या तपासात समोर आले. याच प्रकरणात 'ईडी'ने देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक यांनादेखील अटक केली आहे. तर, सीबीआयकडून देशमुख यांचे वकील अॅड. आनंद डागा यांना प्रकरण भरकटविण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3h0VzDC
No comments:
Post a Comment