ठाणे : करोना प्रतिबंधक मोहिमेत ठाणे जिल्ह्याने आज आतापर्यंतची विक्रमी कामगिरीची नोंद करीत सायंकाळी सातपर्यंत १ लाख २० हजार ८१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची ही पहिलीच वेळ आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. (Record high corona in Thane district) यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी १ लाखापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. दरम्यान, संपूर्ण राज्यात आज सायंकाळी सातपर्यंत आतापर्यंतचे विक्रमी लसीकरण झाले असून १४ लाख २८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. राज्याच्या जोडीला ठाणे जिल्ह्यातही विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३ लाख ९३ हजार ५४९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी ३८ लाख ४८ हजार ९१ नागरिकांना पहिल्या डोसचे तर १५ लाख ४५ हजार ४५८ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ५११ सत्र आयोजित करण्यात आले. देशात राज्याचा लसीकरणात विक्रम दरम्यान, काल बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यातील एकूण १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी ५५ लाखांवर इतकी झाली आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम प्रस्थापित केला आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यात ४,१७४ नवे रुग्ण राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिवसभरात राज्यात ४ हजार १७४ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, दिवसभरात एकूण ४ हजार १५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याबरोबरच, एकूण ६५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3l6fUbF
No comments:
Post a Comment