Breaking

Sunday, September 12, 2021

राजू शेट्टी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटले; केली 'ही' मागणी https://ift.tt/3lcoQwe

नागपूर: महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश शेट्टी यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री यांची भेट घेतली. पुणे - बेंगलोर व रत्नागिरी -नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते बेळगांव जिल्ह्यातील हत्तरकी टोल नाका व आंबा घाटापासून ते मिरज शहरापर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या नद्यावरील पुलामुळे व भरावामुळे यावर्षी कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तातडीने या महामार्गावरील पुलांचा भराव कमी करून कमानी बांधण्यात यावे अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. (farmer leader meets union minister ) कृष्णा , पंचगंगा , दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नदयावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. काळामध्ये नदयांच्या पात्रापासून दोन - दोन किलोमीटर पाणी पसरते. अशा काळात हे पूल बंधाऱ्याचे काम करतात म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते. मी सांगली, कोल्हापूर व बेळगांव जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करत असताना परिसरातील ग्रामस्थ व शेतकर्यांनी पुलाच्या भरावामुळे निर्माण झालेली परिस्थीती निदर्शनास आणून दिली. या तीनही जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा , वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन -दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल, असे शेट्टी यांनी गडकरी यांच्या लक्षात आणून दिले आहे. क्लिक करा आणि वाचा- सध्या रत्नागिरी-नागपूर या नवीन महामार्गाच्या आंबाघाट ते मिरज शहर बायपास रोड या मार्गावरही अनेक ठिकाणी नवीन पुल बांधकाम व भराव टाकण्याचे काम प्रगतीत सुरू असून या कामातही पाणी प्रवाहित होण्यासाठी जलसंपदा विभागातील अधिका-यांसोबत बैठक घेऊन पुलाचा व रस्त्याचा भराव कमी करून कमानी वाढविणे गरजेचे आहे. तरी केंद्र सरकारकडून या पुलांचे भराव कमी करून कमानी बांधकाम करणेस निधी उपलब्ध करून तातडीने या कामांना सुरूवात करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. क्लिक करा आणि वाचा- यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या १५ दिवसात कोल्हापूर , सांगली व बेळगांव या तीनही जिल्ह्यातील महामार्गाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांच पथक पाठवून देण्याबाबत मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2XeVYej

No comments:

Post a Comment