मुरादाबादः उत्तर प्रदेशचा मुरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कुस्ती खेळत असताना एका पैलवानाचा मैदानातच मृत्यू झाला. एका पैलवाने दुसऱ्याला पैलवाना अवघ्या ५ सेकंदात उचलून धोबीपछाड दिला. यात दुसऱ्या पैलवानाची मान मुरगळली गेली. यामुळे तडफडून त्या पैलवानाचा मैदानातच मृत्यू झाला. ही घटना २ सप्टेंबरची आहे. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी संध्याकाळी समोर आला. कुठल्याही परवानगीशिवाय या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोणीच प्रशिक्षित कोच उपस्थित नव्हता. या घटनेनंतरही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. पैलवानाच्या मृत्यूनंतर गावात पंचायत बसली. यानंतर मृत पैलवानाच्या कुटुंबीयांना ६० हजार रुपये देवून प्रकरण मिटवण्यात आलं. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक विद्यासागर मिश्र यांनी या प्रकरणी चौकशीचे केल्याचा दावा केला आहे. फरीदनगर गावात २ सप्टेंबरला कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेसाठी नौमी मेला कमिटीने कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. तसंच कुणी प्रशिक्षकही नव्हता. विशेष म्हणजे माती कुस्तीसाठी आवश्यक असलेली मातीही तयार केली नव्हती. उत्तराखंडमधील काशीपूरच्या गंगानगर गावातील एक पैलवान महेश या कुस्ती स्पर्धात सहभागी होण्यासाठी आला होता. त्याचा सामना पैलवान साजिद अन्सारी याच्याशी सुरू होता. यावेळी साजिदने महेशला उचलून डोक्यावर जमिनीवर आपटवलं. यात महेशच्या मानेला जबर झटका बसला आणि तो तिथेच कोसळला. तडफडणाऱ्या महेशला बघत राहिले महेश याची मान मुरगळल्याने तो जमिनीवर पडलेला होता. दुसरीकडे पैलवान साजिद जिंकल्याने अनेक जण टाळ्या वाजवत होते. पण महेशला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं नाही. अनेक जण त्याची मान नीट करताना दिसले. पण त्याला त्वरीत उपचार न मिळाल्याने त्याचा तडफडून थितेच मृत्यू झाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hhz4Ku
No comments:
Post a Comment