Breaking

Saturday, September 4, 2021

सुहास यथिराजची कमाल; रौप्यपदक मिळवणारे पहिले IAS अधिकारी https://ift.tt/3n4XgDy

टोकियोः पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आणखी एक पदक आपल्या नावावर केलं आहे. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथिराजने रौप्यपदकाची कमाई केली आहे. सुहास यथिराजनं अंतिम फेरी गाठल्यानंतर सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र, पराभव झाल्यानं यथिराजला रौप्यपदाकवरच समाधान मानालं लागलं आहे. विशेष म्हणजे सुहास यशिराज पदक जिंकणारा पहिला आयएएस अधिकारी ठरला आहे. अंतिम लढतीत सुहास यथिराजसमोर फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरचं आव्हान होतं. अंतिम सामन्यात मझूरनं सुहास यशिराजचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. तर, सुहासला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jGoCxP

No comments:

Post a Comment