दुबई : कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादवर अखेरच्या षटकात विजय साकारला. या विजयानंतर आयपीएलच्या प्ले-ऑफचे गणित बदलल्याचे पाहायला मिळत आहे. केकेआरच्या या एका विजयामुळे प्ले-ऑफचे गणित पूर्णपणे बदलले आहे. गुणतालिकेत झाला मोठा बदल, कोणता पाहा...केकेआरने आजच्या सामन्यात सहा विकेट्स राखून दमदाप विजय साकारला. त्यानंतर गुणतालिकेत आता केकेआरचे १३ सामने झाले आहे, यामध्ये त्यांनी सहा विजय मिळवले असून सात लढतींमध्ये त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत १२ गुणांसह केकेआरने आता चौथे स्थान पटकावले आहे आणि प्ले-ऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. कारण या सामन्यापूर्वी केकेआरसह मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे तिन्ही संघ समान १० गुणांवर होते. आता केकेआरचा संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, त्यामुळे बाकिच्या तिन्ही संघांसाठी ही धोक्याची घंटा आहे. आता जवळपास पंजाब किंग्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. कारण आता त्यांचा एकच सामना बाकी आहे आणि त्यामध्ये त्यांनी मोठा विजय मिळवला तरीही त्यांना अन्य संघांच्या निकालावर लक्ष ठेवावे लागणार आहे. आता काही दिवसांत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो, असाच असणार आहे. कारण जो संघ हा सामना गमावेल त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे केकेआरने मोक्याच्या क्षणी हा विजय साकारला आहे. आता केकेआरचा एक सामना बाकी आहे, या सामन्यात केकेआरने जर विजय मिळवला तर प्ले-ऑफमध्ये त्यांचे स्थान जवळपास निश्चित होऊ शकते, त्यासाठी त्यांना जास्त रनरेट मिळवण्याची गरज नसेल. कारण सध्याच्या घडीला केकेआरचा रनरेट हा मुंबई, पंजाब आणि राजस्थान यांच्यापेक्षा सरस आहे. त्यामुळे फक्त एक विजय त्यांना प्ले-ऑफमध्ये नक्कीच नेऊ शकतो. त्यामुळे आता केकेआर आणि मुंबई-राजस्थान यांच्यातील सामन्यावर सर्वांच्या नजरा असतील. कारण हे दोन सामनेच आता निर्णायक ठरणार आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mnQ9US
No comments:
Post a Comment