: पुण्यातील बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. बालेवाडीतील पाटील नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी स्लॅब () कोसळला. या दुर्घटनेत काही जण जखमी झाल्याची आणि अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या ६ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी १२ जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेलं असल्याचं स्थानिक लोक सांगत आहेत. दरम्यान, या परिसरात प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून स्लॅबखाली अडकेल्या इतर लोकांना बाहेर काढलं जात असल्याची माहिती आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3GEnVhQ
No comments:
Post a Comment