अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) पंजाब नॅशनल बँकेत () प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) मुलीने तिच्या एक्स नवऱ्यासोबतत ३ जणांना जबाबदार धरले आहे. याप्रकरणी यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी चौकशीची मागणी केली आहे. अयोध्येत पंजाब नॅशनल बँकेत पब्लिक ऑफिसर म्हणून काम करत असलेल्या एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत एका टाक्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलीच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये तिने तीन जणांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. यामध्ये एक नाव विवेक गुप्ता यांचे आहे, ज्याच्यासोबत मुलीचे लग्न ठरले होते. पण नंतर विवाह तुटला. तर सुसाईड नोटमधील उर्वरित २ नावं धक्कादायक आहेत. यामध्ये पहिले नाव आशिष तिवारी एसएसएफ प्रमुख लखनऊ असे लिहिले आहे, तर दुसरे नाव अनिल रावत पोलीस फैजाबाद असे लिहिले आहे. अयोध्या पोलिसांनी विवेक गुप्ता याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. अखिलेश यादव यांनी केली चौकशीची मागणी या प्रकरणी अखिलेश यादव यांनी ट्विट करून अयोध्येतील पंजाब नॅशनल बँकेच्या महिला कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ज्याप्रकारे पोलिसांवर थेट आरोप केले जात आहेत, ते तेथील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे कटू सत्य असल्याचे म्हटले आहे. यामध्ये थेट आयपीएस अधिकाऱ्याचे नाव घेणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. २ दिवसांनी शेजाऱ्यांनी उघडला दरवाजा श्रद्धा गुप्ता असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. तिचा मृतदेह शनिवारी तिच्या खोलीत ओढणीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिच्या घराचा दरवाजा २ दिवस उघडला नाही आणि फोनही उचलला नाही तेव्हा शेजाऱ्यांनी घरमालकाला माहिती दिली आणि त्याने पोलिसांना बोलावले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mujUEX
No comments:
Post a Comment