Breaking

Monday, October 25, 2021

भाईंदर कोविड सेंटरमध्ये घडला 'हा' धक्कादायक प्रकार; चौकशीचे निर्देश https://ift.tt/2Ztn9nh

मुंबई: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या येथे महिला व ब्लॅकमेल प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. यांनी गंभीर दखल घेतली आहे व पोलीस आयुक्तांना या अनुषंगाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. वाचा: भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिला परिचारिकेचे चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यावर १४ ऑक्टोबर रोजी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. वाचा: नेमकं काय घडलं होतं? भाईंदरमधील न्यू गोल्डन नेस्ट जवळच्या एमएमआरडीए इमारतीत हे कोविड उपचार केंद्र आहे. येथे कंत्राटी सुरक्षा रक्षकाने उपचारासाठी दाखल महिलेवर बलात्कार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. येथील एका सफाई कामगाराला अमली पदार्थ प्रकरणातही अटक झाली होती. त्यामुळे आधीच हे केंद्र वादाच्या भोवऱ्यात असताना येथील एका कंत्राटी कामगाराने केलेला धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. असे या कर्मचाऱ्याचे नाव असून रात्रपाळी सुरू असताना त्याने येथील एका परिचारिकेचे चोरून आक्षेपार्ह चित्रीकरण केले. १३ ऑक्टोबरच्या रात्री हा प्रकार घडला. याबाबत सदर परिचारिकेला संशय आल्याने तिने पांडे याच्याकडील मोबाइल शिताफीने मिळवला. मोबाइल तपासला असता तिचे आक्षेपार्ह चित्रण त्यात आढळले. त्यानंतर पांडे याने परिचारिकेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मात्र, परिचारिकेने त्याच्या धमकीला न जुमानता पोलिसांकडे तक्रार केली व याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच अनुषंगाने नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vI4S1l

No comments:

Post a Comment