गुरुग्रामः सेक्टर -३७ परिसरातील ही घटना आहे. कारखान्यात काम करणाऱ्या एका महिलेवर ३१ वर्षे सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप कारखान्याच्या दोन मालकांवर करण्यात आला आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला अनेकदा विरोध केला होता. पण आरोपी आपल्याला आणि आपल्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प करायचे. अखेर या अत्याचारविरोधात या महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. महिला पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. १९९० मध्ये आपले लग्न झाले. पतीसोबत ती यूपीहून गुरुग्रामला आली. सेक्टर -37 मधील एका कारखान्यात तिचा पती मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता. मालकांनी त्याला कारखाना परिसरातच राहण्यासाठी खोली दिली होती. या खोलीच्या बाजूलाच कारखान्याचे मालक ओमप्रकाश शर्मा आणि सतीश शर्मा उर्फ पिंकी यांचे कार्यालय होते. पीडित महिलेला त्यांनी आपले कार्यालय स्वच्छ करण्याचे काम दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली. १९९० मध्ये पहिल्यांदा बलात्कार केला ५ ऑगस्ट १९९० ला ओमप्रकाश शर्माने पहिल्यांदा आपल्यावर बलात्कार केला. ही घटना सतीश शर्मा उर्फ पिंकीला तिने सांगितली. याबद्दल कोणालाही सांगायचं नाही. त्यानेही महिलेला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दोघांनी अनेकदा महिलेवर बलात्कार केला. या दरम्यान, एकदा आरोपींनी महिलेचा गर्भपातही केला. या सर्व प्रकरणाबद्दल घरी आता कुटुंबाला सर्व काही सांगणार आहे, असं महिला १७ नोव्हेंबर २०१७ ला ओमप्रकाश शर्मा याला म्हणाली. मी विष प्राशन करून आत्महत्या करेन आणि सुसाइड नोटवर तुझं, तुझ्या पतीचं आणि मुलाचं नाव लिहिल. यामुळे तिघांनाही तुरुंगात जावं लागेल, अशी धमकी त्याने पीडित महिलेला दिला. यामुळे ती महिला घाबरली. महिला पोलिसांकडून तपास सुरू २७ नोव्हेंबर २०१७ ला सतीश शर्माने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने अत्याचाराला खूप विरोध केल्यावर आरोपींनी महिलेच्या पतीला सांगितल्यानंतर तिला गावी पाठवले. पण गावावरून परतल्यावर पुन्हा तेच घडू लागलं. यातू सुटका करण्यासाठी पीडित महिला पतीसोबत भाड्याने एका कॉलनीत राहायला गेली. तरीही आरोपी थांबले नाहीत. अखेर पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली. दोन्ही आरोपींविरोधात बुधवारी रात्री महिला पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेने बऱ्याच काळानंतर तक्रार दिली आहे, असं महिला पोलिस निरीक्षक पूनम सिंह यांनी सांगितलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3AjKOTp
No comments:
Post a Comment