मुंबई: नियंत्रणात आल्याने तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्याने शाळा, कॉलेजे आणि धार्मिक स्थळांचे दरवाजे उघडण्यात आल्यानंतर आता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरीय स्पर्धांत सहभागी खेळाडूंना अटी शर्तींच्या आधारे जलतरण तलाव खुले करण्यात आले आहेत. अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. ( Maharashtra ) वाचा: लशीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केलेल्या १८ वर्षांवरील खेळाडू आणि व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांना जलतरण तलावाचा वापर करण्यास, खेळाडूंना सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १८ वर्षांखालील खेळाडूंना त्यांच्या पालकांची संमतीपत्रे व वयाचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, आधारकार्ड अथवा वयाचा उल्लेख असलेले शाळा, कॉलेजचे ओळखपत्र सादर केल्यास त्यांना जलतरण तलावात सराव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाचा: राज्य सरकारने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे करोनाबाबत नियमानुसार सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मुंबईबाबतची माहिती पालिका आयुक्त यांनी परिपत्रकाद्वारे दिली असून राज्य सरकारचा निर्णय मुंबईतही पुढील आदेशापर्यंत जशाच्या तसा लागू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वाचा: दरम्यान, राज्यातील सर्व शाळा ४ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यापाठोपाठ आज घटस्थापनेच्या दिवशीच राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. त्यासोबतच आता ' 'ची पुढची पावले टाकायला सुरुवात करण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून तरणतलाव खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना नियंत्रणात आल्यानेच हे निर्णय घेण्यात येत आहेत. येत्या काळात लसीकरणाची टक्केवारी वाढल्यानंतर स्थिती आणखी सुधारेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FriYsk
No comments:
Post a Comment