: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात जन्मदात्या पित्यानेच आपल्या १६ वर्षीय मुलीवर तीन वर्षांपासून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पित्याच्या अत्याचाराला कंटाळलेल्या पीडित मुलीने अखेर नराधम बापाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भुसावळ शहरातील १६ वर्षीय पीडित मुलीच्या आईचं १३ वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. त्यामुळे ती आपले वडील, आत्या व भावासह राहते. लहानपणापासून आत्यानेच या पीडित मुलीचा सांभाळ केला आहे. दरम्यान, पीडितेचा ४१ वर्षीय पिता गेल्या तीन वर्षांपासून आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. याबाबत कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याच्याकडून दिली जात होती. पीडितेवर काल शनिवारी पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान आरोपीने पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने पीडितेने विरोध करत बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे आपल्यावर घडलेली आपबिती सादर केली. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पीडितेचं म्हणणं ऐकून घेत तातडीने गुन्हा दाखल करून संशयितास अटक केली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक भागवत यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, गजानन वाघ या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mbvxk2
No comments:
Post a Comment