Breaking

Friday, October 1, 2021

मुंबई वगळता राज्यात गरबा रंगणार; पण हा नियम एकदा वाचाच https://ift.tt/3A21UoV

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई वगळता राज्यात इतरत्र खेळण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, गरबा खेळताना करोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी काही पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य सरकारने नुकतीच नवरात्रोत्सव आणि गरबाबाबत नियमावली जाहीर केली होती. त्यात शिथिलता आणून राज्य सरकार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची मान्यता आहे. खुल्या मैदानात आणि बंदिस्त सभागृहांमध्ये गरबा खेळला जातो. गरबा खेळताना सुरक्षित वावराचे नियम, तसेच मास्कचा वापर करावा लागणार आहे. तसेच सभागृहात गरबा खेळताना सभागृहाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के लोक असतील याची दक्षता घ्यावी लागणार आहे. याबरोबरच गरबा खेळताना करोनासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवर्जून सांगितले. वाचाः


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3B50Vp5

No comments:

Post a Comment