मुंबई: मुंबईजवळ समुद्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई केली. गोव्याला निघालेल्या क्रूझवरील एनसीबीच्या पथकाने उधळली. या कारवाईत अभिनेता याचा मुलगा याच्यासह आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून या कारवाईबाबत एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ( ) वाचा: समीर वानखेडे यांनी क्रूझवरील हायप्रोफाइल प्रकरणी तपासाची पुढची दिशा स्पष्ट केली. 'ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्याआधारे हे आरोपी आणि ड्रग्ज तस्कर यांच्यात काही लिंक आहे का, याचा तपास करण्यात येणार आहे', असे वानखेडे यांनी सांगितले. तरुणांच्या या ग्रुपला ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचा माग आम्ही घेत आहोत. त्यात एक ड्रग्ज तस्कर आमच्या जाळ्यात आला आहे. आमच्या दुसऱ्या टीमने ही कारवाई केलीय. संबंधित व्यक्तीने या सर्वांच्या सोबतच पार्टीसाठी बुकिंग केले होते. आरोपींकडे याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत. तो आरोपींच्या संपर्कात होता का, याचाही तपास केला जाणार आहे. या प्रकरणातील ही पुढची कारवाई असून संबंधित व्यक्तीकडे ड्रग्जचा साठा सापडला आहे', अशी महत्त्वाची माहितीही वानखेडे यांनी दिली. वाचा: राजकीय नेता या पार्टीत सहभागी होता, अशी चर्चा होती. त्याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता, हे केवळ कयास लावले जात असून असे प्रश्न कृपा करून विचारू नका, असे वानखेडे म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. अशावेळी त्याबाबत सर्वकाही मी तुमच्यासमोर आताच उघड करू शकत नाही, असेही वानखेडे यांनी स्पष्ट केले व अधिक बोलणे टाळले. दरम्यान, बॉलिवूड-ड्रग्ज माफिया यांच्यातील कनेक्शनचा पर्दाफाश करणाऱ्या अनेक कारवायांमुळे समीर वानखेडे हे गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलावरील कारवाईने वानखेडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. एनसीबीच्या मुंबई युनिटची ही खूप मोठी कारवाई ठरली आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3D7BPqj
No comments:
Post a Comment