Breaking

Saturday, October 2, 2021

राजस्थानने विजयासह मुंबई इंडियन्सला दिला मोठा धक्का, गुणतालिकेत पाहा नेमकं घडलं तरी काय... https://ift.tt/3A8Z5lL

आबुधाबी : राजस्था़न रॉयल्सने आजच्या सामन्यात एका दगडात दोन शिकार केल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण राजस्थानच्या संघाने आज चेन्नईला पराभूत केलेच, पण त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघालाही मोठा धक्का दिला आहे. नेमकं घडलंय तरी काय, पाहा....राजस्थानच्या संघाने चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर १२ लढतींमध्ये पाच विजय मिळवले आहेत, तर त्यांना सातवेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ जो या सामन्यापूर्वी सातव्या स्थानावर होता तो आता सहाव्या स्थानावर पाहोचला आहे. सध्याच्या घडीला राजस्थान आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचे समान १० गुण आहेत. पण आता प्ले-ऑफसाठी सर्व संघांसाठी रनरेट हा महत्वाचा आहे आणि मुंबईच्या संघाने आता रनरेटमध्येच मार खाल्ल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राजस्थान आणि मुंबई यांचे १० गुण असले तरी रनरेट जास्त असल्यामुळे राजस्थानने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला धक्का देत सहावे स्थान पटकावले आहे. राजस्थानचा रनरेट हा - ३३७ आहे, तर मुंबईचा - ४५३ असा रनरेट आहे. त्यामुळे गुण .समान असूनही मुंबई इंडियन्सची गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईच्या संघाने या सामन्यापूर्वीच प्ले-ऑफमध्ये १८ गुणांसह प्रवेश निश्चित केला होता. या सामन्यानंतर चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे समान १८ गुण आहेत, पण चेन्नईचा रनरेट हा दिल्लीपेक्षा सरस असल्यामुळे ते अव्वल स्थानावर कायम आहेत. चेन्नईच्या संघाला आज दोन मुंबईकरांनी जोरदार तडाखा दिल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानच्या संघातील यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या दोन्ही मुंबईकरांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला सात विकेट्स राखून विजय मिळवून दिला. मुंबईकर शिवम दुबेने यावेळी ४२ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ६४ धावांची खेळी साकारली, तर दुसरा मुंबईकर यशस्वी जैस्वालने फक्त २१ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. यशस्वीला यावेळी चेन्नईचा वेगवान गोलंदाज आसिफने बाद करत चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. यशस्वी बाद झाला असला तरी त्यानंतर शिवम दुबेने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Yk9e2j

No comments:

Post a Comment