: विदर्भात आणखी एका राजकीय पक्षाची भर पडली आहे. कारण राज्य आंदोलन समितीने राजकीय आघाडी म्हणून ‘जय विदर्भ पार्टी’ची शनिवारी घोषणा केली आहे. विदर्भ जनता काँग्रेस, विदर्भ राज्य पार्टी, विदर्भ माझा, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ राज्य संघर्ष समिती अशा अनेक पक्ष व संघटनांनी वेगळ्या राज्याच्या मुद्यावर निवडणुकांमध्ये केलेले प्रयत्न याआधी अपयश ठरले आहेत. अशातच आता विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून ‘जय विदर्भ पार्टी’ची स्थापना करण्यात आली आहे. 'शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण, माओवाद, दुष्काळ, अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि विकास यासाठी वेगळे राज्य हाच एकमेव उपाय आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून वेगळ्या राज्याची मागणी रेटण्यासाठी पक्षाची स्थापना केली आहे,' असं या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राम नेवले यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पक्षाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, या पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये प्रस्थापित पक्षांना हादरे देत विदर्भात काही राजकीय यश मिळवता येतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2YcpIK1
No comments:
Post a Comment