नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत मेट्रो प्रवासादरम्यान प्रवाशाकडून नोटांनी भरलेली बॅग जप्त करण्यात आली होती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) एका प्रवाशाकडून एकूण ५८ लाख रुपयांची रोकड जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीआयएसएफने रक्कम जप्त केली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने २३ ऑक्टोबरला लाल किल्ला मेट्रो स्टेशनवर एक्स-बीआयएस मशीनच्या माध्यमातून सामानाच्या तपासणीदरम्यान एका प्रवाशाकडून ५८ लाख रुपये रोख जप्त केले. प्रवाशाचे नाव राजू रंजन असं आहे. तो सिरसापूरचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. व्यावसायिक कारणासाठी घेऊन जात होते एवढी मोठी रक्कम व्यावसायिक कारणासाठी एवढी मोठी ५८ लाख रुपयांची रक्कम सोबत घेऊन जात असल्याचा दावा प्रवाशाने केला आहे. एका प्लास्टिक कंपनीत काम करतो आणि आपण आपल्या काही सहकाऱ्यांना मेट्रो स्टेशनवर बोलावले, असं चौकशीदरम्यान प्रवाशांनी सांगितलं. आयटी अधिकारी तपास करत आहेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयटी अधिकाऱ्यांना कळवले आहे. यानंतर आयटी अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी मालक अशोक बन्सल यांना आयटी अधिकार्यांनी बोलावले होते आणि जप्त केलेली रक्कम आयटी अधिकार्यांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनवरील लॉकरमध्ये ठेवली होती. जप्त केलेली रक्कम चंदिगडचे रहिवासी असलेल्या अशोक बन्सल यांना आयटी अधिकार्यांनी २४ ऑक्टोबरला तपासासाठी बोलावले होते. अशोक बन्सल यांनी रोकडबाबत ठोस माहिती न दिल्याने आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरल्याने २५ ऑक्टोबरला आयटी अधिकार्यांनी ही रक्कम जप्त केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3GoXYD1
No comments:
Post a Comment