मुंबई: मध्य रेल्वेने उद्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉकची घोषणा केली आहे. उद्या हा माटुंहा ते मुंलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत असणार आहे. (central railway anounces on central and harbour railway on sunday 31st october 2021) मध्य रेल्वेवर असा असेल मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १० वाजून १८ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच या वेळेत लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड येथे पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. क्लिक करा आणि वाचा- ठाणे येथून सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर या लोकल नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. हार्बर मार्गावर असा असेल मेगाब्लॉक हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी ते सायंकाळी ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांपासून ते ते दुपारी ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत रद्द राहतील. क्लिक करा आणि वाचा- पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल अणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. क्लिक करा आणि वाचा- हार्बरच्या प्रवाशांना मेन लाइनवरून प्रवासास मुभा हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. दरम्यान, पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक्स आवश्यक आहेत. रेल्वे प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असे मध्य रेल्वेने कळवले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jRU0t0
No comments:
Post a Comment