Breaking

Friday, October 8, 2021

एक शब्दही न बोलता जॉनी लीवर यांनी शाहरुखला दिला पाठिंबा; ट्विट चर्चेत https://ift.tt/3DnDN61

मुंबई: क्रूझवर पार्टी करण्यासाठी अमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आज आर्यन खानला जामीन मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आज आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जामिनासाठी तब्बल अडीच तास युक्तिवाद केला. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नसल्याचं स्पष्ट झालं. आर्यन झाल्यानं बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली असून अनेक सेलिब्रिटी शाहरुख खानला पाठिंबा देत आहेत. या यादित अभिनेते यांचं नाव आलं आहे. जॉनी लीवर यांनी शाहरुखला पाठिंबा देण्यासाठी एक ट्विट केलं आहे. हे ट्विटसध्या चर्चेत आलं आहे. एक शब्दही न लिहिता जॉनी लीवर यांनी कठिण काळात तुझ्यासोबत आहे, तू लढ असा संदेश दिला आहे. त्यांनी एक जुना फोटोही शेअर केला आहे. मदतीसाठी शाहरुख आलेला धावूनकाही दिवसांपूर्वी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत जॉनी लीवर म्हणाले होते की, 'एक काळ असा होता की जेव्हा त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी होत्या. पण तरीही ते सिनेमांमध्ये एकाहून एक सरस विनोदी दृष्य चित्रीत करत होते. याबद्दल बोलताना जॉनी यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांचं ऑपरेशन करायचं होतं पण ते सिनेमांमध्ये खूप व्यग्र होते. असं असलं तरी जॉनी यांनी कधीही आपल्या वैयक्तिक अडचणींचा त्यांच्या कामावर परिणाम होऊ दिला नाही. तसंच आपल्या समस्याही कोणालाही सांगितल्या नाहीत. जॉनी यांनी सांगितलं की शाहरुखला त्यांच्या वडिलांच्या तब्येतीविषयी कुठून तरी कळालं. जॉनी यांना याबद्दल फारसं बोलायचं नव्हतं. तरी शाहरुखने त्यांना कोणत्याही प्रकारची मदत हवी का ते विचारलं. त्यामुळं शाहरुखवर आणि त्याच्या कुटुंबियांवर आलेल्या संकटात जॉनी यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30dxMuF

No comments:

Post a Comment