मुंबई: भायखळा येथील जे. जे. मार्ग येथील गुलमोहर टॅरेस या इमारतीमधील लिफ्ट कोसळून () झालेल्या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. (5 injured in building collapse against unknown person) लिफ्ट कोसळून ५ व्यक्ती जखमी झाल्याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. लिफ्टची बांधणी, देखभाल आणि दुरूस्ती यामध्ये निष्काळजीपणे केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आला असून त्याअनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र काहीजण जखमी असून यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- लिफ्ट दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे: १. हुमा खान (२४) २. अर्षा खान (७) ३. सोहन काद्री (३) ४. निलोफर रिजवान शेख (३६) ५. शाहिन खान (४५) क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ZNzwL9
No comments:
Post a Comment