Breaking

Saturday, October 2, 2021

खंडेराव नगरात दोन गटात दंगल; पोलिसांवरच केली दगडफेक https://ift.tt/3F9zxJ7

म.टा. प्रतिनिधी, जळगाव जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात असलेल्या आझाद नगर भागात शनिवारी रात्री दोन गटात वाद झाला. घटनास्थळी मोठा जमाव जमला. दोन्ही बाजूने दगडफेक झाली आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांवरही दगडफेक झाल्याने तणाव वाढला आहे. ( two groups in khanderao town and ) शहरातील खंडेराव नगर परिसरात असलेल्या आजाद नगर भागात आज सायंकाळी शनिवारचा बाजार होता. बाजारात एका मुलीची छेड काढल्यावरून रात्री आठ वाजेच्या सुमारास वाद झाला. एक गट दुसऱ्या गटाला जाब विचारायला गेला असता दोन्ही गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. क्लिक करा आणि वाचा- वाद वाढल्याने काही वेळाने दोन्ही कडील गट आमनेसामने येऊन दगडफेक सुरू झाली. वादात एका गटाने पोलिसांच्या सीसीटीव्ही कमेऱ्यांची देखील तोडफोड केली. घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि क्यूआरटी पथक पोहचले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3B5rLO2

No comments:

Post a Comment