चेन्नईः तामिळनाडूतील कालाकुरिची जिल्ह्यातील शंकरपूरम येथे आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. शहरातील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जण जखमी झालेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी भरपाई जाहीर केली दुर्घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमी झाले आहेत आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत, त्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3GAk3yL
No comments:
Post a Comment