Breaking

Monday, October 25, 2021

नितीन गडकरी म्हणाले, 'सरकारमध्ये उच्चस्तरावर मोठ्या प्रमाणावर अहंकार...' https://ift.tt/3Gj0DhB

नवी दिल्लीः केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजपचे नेते हे स्पष्टवक्ते आहेत. यामुळे कुठल्याही मुद्द्यावर स्पष्टपणे भूमिका मांडतात. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी सरकारमधील कार्य शैलीवर बोट ठेवलं. सरकारमध्ये उच्चस्तरावर अहंकार (इगो) असतो. हा अहंकार बहुतेक ठिकाणी आपल्याला दिसून येतो, असं नितीन गडकरी म्हणाले. 'कन्सल्ट' या वैयक्तिक सल्ला अॅपच्या लाँचिंगवेळी गडकरी बोलत होते. सरकारमध्ये अनेक ठिकाणी अहंकार असतो. खासकरून सरकारमध्ये उच्चस्तराहव अधिक अहंकार असतो. सर्वकाही आपल्याला कळलं पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणून कुणाचा सल्ला घेणं किंवा कुणाचं ऐकणं हे बहुतेक ठिकाणी होत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले. कोणीच शंभर टक्के परिपूर्ण नसतो आणि आपण परिपूर्ण असल्याचा दावा कोणीच करू शकत नाही. आपल्यातही काही उणीवा आहेत आणि त्यातून इतरांकडून जाणून घेण्याचा जो भाव असतो, यामुळे आपल्याला अधिक माहिती मिळते, असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. दिल्लीला मी कधी आलो नव्हतो. आपल्याला यायचं नव्हतं. अपघाताने मी दिल्लीला आलो आहे. राज्य सरकारमध्ये असताना दिल्लीत आल्यानंतर आपल्याकडून इथे रहावलं जात नव्हतं. रात्रीची फ्लाइट पकडून मुंबईला निघून जायचो. पण दिल्लीत मी दिल्ली रहायला लागल्यावर अनेकांची भेट झाली आणि संपर्क झाला. तेव्हा एका मित्राला एक गोष्ट सांगितली होती. ज्यांना मी मोठं समजत होतो, त्यांच्या जवळ गेल्यावर कळलं की ते किती छोटे आहेत. आणि ज्यांना छोटं समजत होतो, ते किती मोठे आहेत, हे कळलं. हे जे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, ते कुणाचं पेटंट नाहीए. यामुळे माहितीला आपण ज्ञान म्हणतो आणि ज्ञान म्हणजे शक्ती. ज्ञानाचं मालमत्तेत रुपांतर होणं म्हणजे भविष्य आहे, असं आपलं मत असल्याचं गडकरींनी सांगितलं. सरकारी प्रकल्पांना विलंब होण्याचे कारण म्हणजे निर्णय वेळेवर घेतले जात नाहीत. निर्णय काय घेतले जातात, ही समस्या नाही. निर्णयच घेतले जात नाहीत, ही मूळ समस्या आहे. सहसचिवांची चूक सचिव सावरतात, सचिवाची चूक मंत्री सावरतात. पण मी पारदर्शक आहे. जबाबदारी निश्चित करण्यात विश्वास ठेवतो, असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. 'माझीही जमीन घ्या, असं आता लोक म्हणताहेत' आता भूसंपादनासाठी जास्त पैसे दिले जातात. त्यामुळे सर्व राष्ट्रीय महामार्ग, एक्स्प्रेस-वेचे प्रकल्प सुरू असतानाही भूसंपादनाच्या मुद्द्यावर कुठेही विरोध होत नाही. माझी जमीन घेऊ नका, असं लोकं आता म्हणत नाहीत. लोक आता माझीही जमीन घ्या, असं ते सांगत असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3baC1Jq

No comments:

Post a Comment